feedpune news News: अखिल भारतीय कीमराठवाडा संमेलन? – all india kimberthwada meeting?

- year ender poll - feedpune news News: अखिल भारतीय कीमराठवाडा संमेलन? – all india kimberthwada meeting?
http://maharashtratimes.indiatimes.com/  -   - feedpune news News: अखिल भारतीय कीमराठवाडा संमेलन? – all india kimberthwada meeting?

अखिल भारतीय कीमराठवाडा संमेलन?

कार्यक्रमांत स्थानिकांचाच भरणा अधिक; साहित्य वर्तुळात नाराजी

Chintamani.Patki@timesgroup.com

Tweet : @chintamanipMT

पुणे : आगामी साहित्य संमेलन तोंडावर आले असताना आयोजकांनी पत्रिका प्रसिद्ध करून संमेलनाची रूपरेषा जाहीर केली. मात्र, कार्यक्रम पत्रिकेमध्ये स्थानिक लोकांच्याच नावांचा भरणा असल्याने संमेलनाला ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ म्हणायचे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

परिसंवाद, कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर साहित्यिक कार्यक्रमांमध्ये केवळ स्थानिक लोकांचाच भरणा असल्याने साहित्य वर्तुळात नाराजी पसरली आहे. संमेलनात स्थानिक कला-साहित्याचे प्रतिबिंब पडायला हरकत नाही; पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वरूप ‘मराठवाडा साहित्य संमेलन’ असे कशासाठी, असा सवाल साहित्य वर्तुळातून केला जात आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९३ वे साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारी दरम्यान होणार आहे. महामंडळाने उर्वरित घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांना विश्वासात न घेताच काही कार्यक्रमांची आखणी केल्याचा आरोप संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पुण्यात २००९ मध्ये झालेल्या संमेलनाचे उद्घाटन ना. धों. महानोर यांच्या हस्ते झाले होते. यंदाच्या संमेलनाचा उद्घाटनाचा मान त्यांनाच देण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचा विचार व्हायला हवा होता, असा सूर आळवला जात आहे.

प्रतिभा रानडे यांची मुलाखत वगळता ‘आजचे भरमसाठ कवितालेखन : बाळसं की सूज?’, ‘अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील जीवन जाणिवा’, ‘एकविसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्यात वाचण्यासारखे काय आहे?’, ‘संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न झाल्यामुळे समाजात बुवाबाजीचे प्रस्थ वाढत आहे,”http://maharashtratimes.indiatimes.com/”आजचे सामाजिक वास्तव आणि मराठी लेखक’, ‘शेतकऱ्याचा आसूड’ या विषयावरील परिसंवादात तसेच निमंत्रितांचे कविसंमेलन, कविकट्टा, कथाकथन, आमचे कवी : आमच्या कविता, संवाद : आजच्या लक्षवेधी कथालेखकांशी व बालकुमार मेळावा या कार्यक्रमांमध्ये स्थानिक मंडळींचाच भरणा अधिक आहे.

संमेलनात प्रा. भास्कर चंदनशिव, लक्ष्मणराव शिरभाते आणि सुमती लांडे यांचा सत्कार होणार आहे. संमेलनाचा समारोप ज्येष्ठ लेखक प्रा. रा. रं. बोराडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. मात्र, याविषयी घटक संस्थांना माहिती नव्हती, अशी चर्चा आहे.

पत्रिका मिळाली तेव्हा मार्गदर्शन समितीने न ठरवलेला काही भाग वाचायला मिळाल्याने आश्चर्य वाटले. आमचे कवी : आमच्या कविता या नंतर ठरलेल्या कविसंमेलनात इतर भागातील कवींना का स्थान नाही, असे अनेकजण विचारत आहेत. महामंडळाचा कारभार घटक, समाविष्ट व संलग्न संस्थांना विचारात घेऊन व्हावा.

– प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद

संमेलनाचा तीन दिवसांचा कार्यक्रम ठरवला तसाच आहे. कार्यक्रमांची आखणी केल्यानंतर जागा आणि वेळ शिल्लक राहिल्यामुळे आमचे कवी : आमच्या कविता हे स्थानिक कवींचे संमेलन आयोजित केले. स्थानिक लोकांसाठी एक कार्यक्रम घ्यायला हरकत नाही. आम्ही कोणालाही टा‌ळलेले नाही.

– प्रा. कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष-साहित्य महामंडळ

Source